नवी दिल्ली - मोदी सरकारने प्रामाणिक करदात्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी करप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले असून Transparent Taxation - Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. पंतप्रधानांनी 'पारदर्शी कर व्यवस्था- ईमानदारांचा सन्मान' प्लॅटफार्मचे उद्घाटन केले. याच वेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून एक गोष्ट मागितली आहे. मोदींनी देशातील नागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याचं आवाहन केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी 'गेल्या सहा-सात वर्षात कर विवरण भरणाऱ्यांची संख्या ही जवळपास अडीच कोटींनी वाढली आहे. ही मोठी वाढ आहे. मात्र असं असताना 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त दीड कोटी लोक आयकर भरतात' असं म्हटंल आहे. तसेच 'आज मी देशवासियांना विनंती करतो, जे सक्षम आहेत त्यांनाही विनंती करतो. आपण सर्वांनी यावर विचार करणे आवश्यक आहे. स्वावलंबी भारतासाठी हे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीयांची ही जबाबदारी आहे. दोन दिवसांनंतर 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण करा. देशासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला देखील वाटेल' असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी 'ही जबाबदारी फक्त कर विभागाची नाही. प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे' असं देखील म्हटलं आहे. गेल्या सहा वर्षांत आमच लक्ष्य़ सरकारी प्रणालीमध्ये महत्वाचे बदल करण्यावर राहिला आहे. आजपासून नवा प्रवास सुरू झाला आहे. देशाचा प्रामाणिक करदाता देशाच्या बांधणीसाठी मोठी भूमिका निभावत असतो. जेव्हा त्याचे आयुष्य सोपे होते, तेव्हा तो प्रगती करतो, यामुळे देशही प्रगती करू लागतो. आजपासून सुरु होणाऱ्या या सुविधेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होणार असून अधिकाधिक कारभार चालविला जाणार आहे, असंही मोदी म्हणाले.
लोकांच्या गरजेनुसार नियम बनविले जात आहेत. याचे चांगले परिणामही देशाला दिसू लागले आहेत. आता शॉर्टकट चुकीचा आहे, याचा भास साऱ्यांनाच होत आहे. चुकीचे मार्ग पकडणे योग्य नाहीय हे देखील ते जाणत आहेत. तो काळ आता मागे सरला आहे. आता कर्तव्य आणि देशसेवेची भावना जोर पकडत आहे. हा बदल सक्ती किंवा शिक्षा देऊन आलेला नाही. सरकारची जेव्हा निती स्पष्ट असते तेव्हा काळे करण्याची वृत्ती कमी होऊ लागते. सामान्यांचा विश्वास वाढू लागतो. सरकारी कामामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा वापर आणि सरकारी यंत्रणेतील चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार देणे ही यामागची कारणे आहेत, असं मोदी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल
"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"
Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"
सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं
कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती