Vande Bharat Sleeper Train News : ताशी १६० किमी इतक्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणे आता आणखी आरामदायक बनणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन सुरू केली जाणार असून, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर गाडीच्या प्रोटोटाइप मॉडेलचे रविवारी (१ सप्टेंबर) अनावरण केले. प्रवास आरामदायक व्हावा अशा पद्धतीने बर्थ आणि बोगींची रचना केलेली आहे. या गाडीची पहिली झलक व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. (watch vande bharat sleeper train latest Video)
वंदे भारत ट्रेन पाठोपाठ आता वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावणार आहेत. BEML ने वंदे भारत ट्रेनच्या कोचची बांधणी केली असून, प्रोटोटाइप मॉडेलच्या माध्यमातून या ट्रेनचा पहिला लुक अखेर समोर आला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचे अनावरण केले. ट्रेनच्या आतमधील दृश्य बघितले, तर प्रवाशांना विमान प्रवासाचीच अनुभूती प्रवास करताना येणार आहे.
कशी आहे वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस?
वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला एकूण १६ डब्बे असणार आहेत. प्रोटोटाईप मॉडेलमध्ये ११ एससी ३ टिअर कोच, ४ एससी २ टिअर कोच आणि एक एससी फर्स्ट क्लास कोच असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनमध्ये एससी 611 थर्ड एससी सीट्स असणार आहे. तर १८८ सेंकड एससी आणि २४ फर्स्ट क्लास एससी सीट्स असतील.
भारतीय रेल्वे आणि बीईएमएल यांच्या म्हणण्यांनुसार वंदे भारत स्लीपर ट्रेन जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. युरोपीय मानकांनुसार ही ट्रेन बनवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये जीएफआरपी पॅनल, बाहेरचे दरवाजे ऑटोमॅटिक, तर आतील दरवाजे सेन्सर आधारित आहेत.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये
प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी ट्रेनमध्ये वाचन करण्यासाठी लाईट आहे. त्याचबरोबर युएसबी चार्जिंग पॉईंट आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि टॉयलेटही आहे. उद्घोषणा करण्यासाठी व्यवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहे. एससी १ टिअरमध्ये गरम पाणी असणार आहे.