एकंबीतील शिबिरात ६५२ पशूंवर उपचार
By admin | Published: August 07, 2015 9:35 PM
बेलकुंड : जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने गुरुवारी औसा तालुक्यातील एकंबी येथे आयोजित शिबिरात ६५२ पशूधनावर उपचार करण्यात आले़ यावेळी ६० पशूधनावर औषधोपचार, कृत्रिम रेतन १, घटसर्प लसीकरण २८५, गोचिड, गोमाशी निर्मुलन ३६७, गर्भ तपासणी व वंध्यत्व तपासणी ४७, शस्त्रक्रिया १५, जंतनाशक औषधी २८५ करण्यात आले़ यशस्वीतेसाठी डॉ़ के़जी़ शेळके, पशुधन विकास अधिकारी डॉ़ गोडभरले, डॉ़ पाटील, डॉ़ मुळे, डॉ़ सास्तूरकर, डॉ़ बोरोळे, डॉ़ बिराजदार, डॉ़ गायकवाड, डॉ़ सोनवणे, डॉ़ सलगर, डॉ़ अनिल लसणे, डॉ़ चिवडे, डॉ़ फुलसंुदर, डॉ़ कलवले, फडणीस, बागल, सूर्यवंशी, शेख, सर्जे, राऊत, क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले़ शेवटी आभार सरपंच काकासाहेब पाटील यांनी मानले़
बेलकुंड : जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने गुरुवारी औसा तालुक्यातील एकंबी येथे आयोजित शिबिरात ६५२ पशूधनावर उपचार करण्यात आले़ यावेळी ६० पशूधनावर औषधोपचार, कृत्रिम रेतन १, घटसर्प लसीकरण २८५, गोचिड, गोमाशी निर्मुलन ३६७, गर्भ तपासणी व वंध्यत्व तपासणी ४७, शस्त्रक्रिया १५, जंतनाशक औषधी २८५ करण्यात आले़ यशस्वीतेसाठी डॉ़ के़जी़ शेळके, पशुधन विकास अधिकारी डॉ़ गोडभरले, डॉ़ पाटील, डॉ़ मुळे, डॉ़ सास्तूरकर, डॉ़ बोरोळे, डॉ़ बिराजदार, डॉ़ गायकवाड, डॉ़ सोनवणे, डॉ़ सलगर, डॉ़ अनिल लसणे, डॉ़ चिवडे, डॉ़ फुलसंुदर, डॉ़ कलवले, फडणीस, बागल, सूर्यवंशी, शेख, सर्जे, राऊत, क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले़ शेवटी आभार सरपंच काकासाहेब पाटील यांनी मानले़ चारा छावणी उभारण्याची मागणी मसलगा : निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा, आनंदवाडी, मुगाव, पानचिंचोली, शेंद, शिवणी को़ आदी परिसरात पाऊस नसल्याने चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे येथे चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी बुधवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़पावसाळा सुरु होऊन दोन महिने होत आहेत़ मात्र, या परिसरात अद्यापही पाऊस नाही़ त्यामुळे पेरणीही झाली नाही़ परिणामी, शिवार उजाड माळरान बनले आहेत़ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे़ दरम्यान, पशूधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे पशूधनाची रानोमाळ भटकंती सुरु आहे़ या भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ प्रशासनाने त्वरित चारा छावणी उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ यावेळी विठ्ठल देशमुख, ज्ञानोबा चामे, राजेंद्र कासले, नामदेव तावडे, नरसिंग ढाकणे, मुरली कांबळे, शेषेराव भोजने, सुनील चामे, कुमार देशमुख, प्रकाश पांचाळ, विष्णू पाटील, धोंडिराम सावंत, हणमंतराव दिवे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़