पथराड येथे चाकूहल्यात प्रौढ जखमी अतिदक्षता विभागात उपचार : बैल बिथरल्यावरून झाला वाद
By admin | Published: March 15, 2016 12:34 AM
जळगाव : बैल बिथरल्यावरुन झालेल्या वादानंतर पथराड, ता. धरणगाव येथे दोन जणांनी भगवान सुखदेव मराठे (४६) यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडली.
जळगाव : बैल बिथरल्यावरुन झालेल्या वादानंतर पथराड, ता. धरणगाव येथे दोन जणांनी भगवान सुखदेव मराठे (४६) यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडली. या बाबत भगवान मराठे यांनी सांगितले की, मी रविवारी बैल घेऊन जात असताना राजेंद्र दौलत शिंदे, त्यांची पत्नी व विजय राजेंद्र शिंदे हे पाणी भरत असलेल्या ठिकाणी बैल बिथरले. त्यात माझी काहीही चूक नव्हती. तरी सुद्धा तेथे शिंदे कुटुंबीयांनी वाद घातला. त्यानंतर सोमवारी त्याच कुटुंबातील संजय राजेंद्र शिंदे हा चाकू घेऊन फिरत होता व तो माझा भाचा रवींद्र आनंद गुंजाळ याच्याजवळ गेला. त्यावेळी मी त्याला विचारणा केली असता संजयसह राहुल राजेंद्र शिंदे या दोघांनी माझ्यावर चाकू हल्ला केला, असे भगवान मराठे यांनी सांगितले. यामध्ये मराठे यांच्या छाती जवळ जखम झाली असून हल्ल्यानंतर ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना तात्काळ जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आपण पाळधी पोलीस चौकीमध्ये कळविले असल्याचे मराठे यांनी सांगितले.