अघोरी कृत्यातील तरुणीवर उपचार सुरू
By admin | Published: September 03, 2015 12:17 AM
सोलापूर : जिल्हा परिषद परिसरातील धार्मिक स्थळात साखळीने बांधण्यात आलेल्या मनोरुग्ण तरुणीला अंधर्शद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त करून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर योग्य उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती स्थिर आहे.
सोलापूर : जिल्हा परिषद परिसरातील धार्मिक स्थळात साखळीने बांधण्यात आलेल्या मनोरुग्ण तरुणीला अंधर्शद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त करून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर योग्य उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती स्थिर आहे. एका 20 वर्षीय तरुणीला भूत पिशाचाची बाधा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळात पायाला साखळीने बांधून ठेवल्याची माहिती अंधर्शद्धा निर्मूलन समितीला समजली होती. त्यानुसार अँड. गोविंद पाटील यांनी पोलीस व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी येथे गेले. तेथे साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या तरुणीला सोडविले. तेव्हा काही लोकांनी याला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची समजूत काढत पोलिसांनी तरुणीची सुटका केली. या तरुणीला शासकीय रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. कोणत्यातरी बुवाबाजी करणार्या व्यक्तीच्या सांगण्यावरून या तरुणीला धार्मिक स्थळात बांधून ठेवले असेल की काय, म्हणून पोलिसांनी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याबाबत चौकशी केली. मात्र खरे कारण समजू शकले नाही. वास्तविक पाहता तरुणीचा विवाह झालेला असून घरची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलिसात गुन्हा दाखल केला नाही. यासाठी अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे ऋषीकेश बदामीकर, अँड. राजन दीक्षित, डॉ. सुरेश व्यवहारे, ब्र?ानंद धडके आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)कोट..काही तरी मानसिक धक्का बसल्याने तरुणी मनोरुग्ण झाली आहे. तिच्यावर अघोरी उपाय करण्याऐवजी हॉस्पिटलचा उपाय करणे आवश्यक होते. सध्या ती तरुणी ठीक असून आम्ही जिल्?ाबाहेरील डॉक्टरांशी संपर्क करीत आहोत. ती यापेक्षा आणखी बरी कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. अँड. गोविंद पाटील, अंधर्शद्धा निर्मूलन समिती, सोलापूर.