पत्नी पहायची पॉर्न, करायची..., पती वैतागून कोर्टात पोहोचला; जजनी त्यालाच फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:46 IST2025-03-20T09:58:45+5:302025-03-20T11:46:21+5:30
पती पत्नींमधील नाजूक संबंधांचे प्रकरण मद्रासच्या हायकोर्टात गेले होते. या प्रकरणाचा निकाल आला आणि त्याची चर्चा होऊ लागली आहे.

पत्नी पहायची पॉर्न, करायची..., पती वैतागून कोर्टात पोहोचला; जजनी त्यालाच फटकारले
पती पत्नींमधील नाजूक संबंधांचे प्रकरण मद्रासच्या हायकोर्टात गेले होते. या प्रकरणाचा निकाल आला आणि त्याची चर्चा होऊ लागली आहे. विषय असा होता की, एका व्यक्तीचा पत्नी एकांतात अश्लिल फिल्म पहायची आणि हस्तमैथुन करायची. यामुळे पत्नी आपल्याला हवे तसे शरीरसुख देत नसल्याचा आरोप करत पतीने कोर्टात जात घटस्फोट मागितला होता. पण या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने यातील फरक सांगितला आणि त्याला फटकारत वेगळे होण्याची मागणी फेटाळली आहे.
मद्रास हायकोर्टाच्या कौंटुंबिक न्यायालयाने यावर निकाल देताना म्हटले की, महिलेद्वारे एकटीने पॉर्न पाहणे आणि हस्तमैथुन करणे म्हणजे पतीसोबत क्रुरता होत नाही. जेव्हा पुरुष हस्तमैथुन करतात तेव्हा ती क्रिया सर्वमान्य असते. परंतू तेच महिलेने केले तर ती कलंकित कशी मानली जाऊ शकते, असे म्हणत न्यायमूर्तींनी महिला आणि पुरुषांमधील हस्तमैथुनाचा फरक स्पष्ट केला आहे.
पुरुषाने हस्तमैथुन केले तर तो लगेचच शरीरसंबंध ठेवू शकत नाही. परंतू महिलांच्या बाबतीत असे होत नाही. यामुळे पत्नी हस्तमैथुन करत असेल तर पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध प्रभावित होतील असे कुठेच झालेले नाही, असे न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन आणि आर पुर्णिमा यांच्या खंडपीठाने म्हटले. तसेच पतीच्या आरोपांवरून त्या महिलेला कोर्टात बोलविणे हेच तिच्या लैंगिक स्वायत्ततेचे घोर उल्लंघन आहे. तिने एकवेळ लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवले असते तर ते घटस्फोटाचे कारण बनले असते. परंतू, हे कारण ग्राह्या मानून घटस्फोट मिळणार नाही. ही कृती कोणत्याही प्रकारे पतीवर क्रुरता केल्याची होत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्तींनी केली आहे.
याचबरोबर जर एखाद्या पॉर्न पाहणाऱ्याने दुसऱ्या जोडीदाराला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले तर ते निश्चितच क्रूरता ठरेल.तसेच जर या व्यसनामुळे एखाद्याच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यावर प्रतिकूल परिणाम झाला तर ती कारवाईला योग्य ठरेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळली आहे.
महत्वाचे म्हणजे जुलै २०१८ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. दोघांचेही दुसरे लग्न होते, तसेच या लग्नानंतर दोघांनाही मूल झालेले नाही. पत्नीच्या या सवयीमुळे पती-पत्नी २०२० मध्येच वेगळे झाले होते. पत्नीने वैवाहिक हक्क परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर पतीने घटस्फोट मागितला होता. कौटुंबिक न्यायालयाने पुरुषाची याचिका २०२४ मध्ये फेटाळून लावली होती, ज्यावर त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.