ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी आणि दलितांचं आरक्षण धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. धर्मनिरपेक्षता संपवण्यासाठी केंद्रातील सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी घणाघाती टीका सोनिया गांधींनी मोदी सरकारवर केली आहे. भाजपकडून लोकशाहीची हत्या करण्याचं काम सुरू आहे. ज्यांनी संविधानाच्या निर्मितीमध्ये काहीच योगदान दिले नाही ते संविधानाविषयी बोलत असल्याचं म्हणत सोनिया गांधींनी भाजपवर टीका केली आहेत.
भाषणातील ठळक मुद्दे -
- धर्मनिरपेक्षता संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे
- भाजप विभाजनाचं राजकारण करतंय.
-संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्वांना न्याय मिळवून दिला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्त्रोत
- आरएसएसच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार
- काँग्रेसची सरकारं पाडण्याचा मोदींचा डाव
- देशाला संघ आणि भाजपच्या विचारांपासून धोका