रघुनाथ पांडे - नवी दिल्लीगोंधळी आमदारांना आवरून विधिमंडळातील प्रश्नोत्तराचा तास ‘विनाव्यत्यय’ पार पाडण्यासाठी ‘त्या’ तासापुरती आमदारांना शपथ देता येईल का, ही महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाची ‘युक्ती’ लोकसभा सचिवालयाला आवडली खरी, मात्र अशी शपथ दिल्याने आमदारांंच्या स्वातंत्र्यावर गदा तर येणार नाही, हे तपासूनच पुढचा निर्णय होणार आहे.केवळ नियमावर बोट दाखवून कामकाज सुरळीत करण्यापेक्षा सदस्यांची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजेत असा विचार पुढे आला. प्रश्नोत्तराच्या तासात किमान १०- १२ प्रश्न मार्गी लागावेत यासाठी केंद्रीय स्तरावर गंभीरपणे चर्चा सुरू असून, सोमवारी त्यासाठी अनेक सूचना करण्यात आल्या.विधिमंडळातील प्रश्नोत्तराचा तास सुरळीत पार पडावा म्हणून लोकसभा सचिवालयाने ११ विधानसभा अध्यक्षांची समिती तयार केली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे याचे सदस्य आहेत. सोमवारी राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक झाली. बागडे यांनी सांगितले की, ‘विधिमंडळ कामकाजाचा पहिला प्रश्नोत्तराचा तास सुरळीत पार पडावा यासाठी विरोधीपक्ष नेते, गटनेतेही त्यासाठी अनुकुल असतात. पण अनेकदा वेळेवर आलेल्या विषयामुळे तास प्रारंभ होताच व्यत्यय निर्माण होतो आणि या तासाचे कामकाज रखडते. प्रश्नोत्तराचा तास कोणत्याही परिस्थितीत वगळायचा नाही असा दंडकच केल्याने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०० च्या आसपास प्रश्न मार्गी लागले.
त्या ‘तासापुरती’ आमदारांना शपथ देण्याची युक्ती!
By admin | Published: April 13, 2015 11:54 PM