शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, २५ महिलांसह २७ जणांचा मृत्यू 
2
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
3
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
4
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
5
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली
6
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
7
Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार
8
मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई 
9
BREAKING : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा! BCCI ने अचानक संघ बदलला; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी
10
ऑल टाईम हाय नंतर Nifty, Sensex झाले रेंज बाऊंड; IT शेअर्स चमकले, Airtelमध्ये प्रॉफिट बुकिंग
11
राहुल गांधींच्या 'हिंदूं'वरील वक्तव्याने वाद; BJP खासदार बन्सुरी स्वराज यांनी बजावली नोटीस...
12
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
13
'सरकारला सत्य सहन होत नाही', भाषणातील काही भाग काढून टाकल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतापले
14
"...तेव्हा का सूचलं नाही?", अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी करताच संतापल्या सुषमा अंधारे! 
15
Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित
16
नेपाळच्याही संघात बाबर आझमला संधी मिळणार नाही; शोएब मलिकची सडकून टीका
17
राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'
18
तो चेंडू रोहितकडे फेकणार होतो, पण...; त्या झेलवरील वादावर सूर्याचा मोठा गौप्यस्फोट
19
HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह 'या' सेवाही वापरता येणार नाहीत

Golden Temple: गालावर ‘तिरंगा’, महिलेला सुवर्ण मंदिरात नो एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 7:39 AM

Golden Temple: गालावर ‘तिरंगा’ काढल्यामुळे पंजाबच्या अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिलेला प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद सुरू झाला. ‘हे पंजाब आहे, भारत नाही’ असे धक्कादायक उत्तर मंदिराच्या सेवादाराने दिल्याचेही व्हिडीओत दिसले.

गालावर ‘तिरंगा’ काढल्यामुळे पंजाबच्या अमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिलेला प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद सुरू झाला. ‘हे पंजाब आहे, भारत नाही’ असे धक्कादायक उत्तर मंदिराच्या सेवादाराने दिल्याचेही व्हिडीओत दिसले. त्यानंतर, ‘खलिस्तानींनी सुवर्ण मंदिर ताब्यात घेतले’, अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होताच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) ‘तो राष्ट्रध्वज नव्हता, कर्मचाऱ्याच्या वागण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो’, असे निवेदन जारी केले.

महिला अटारी येथील ध्वज उतरवण्याचा सोहळा पाहिल्यानंतर सुवर्ण मंदिरात आली होती. महिलेसोबतची व्यक्ती मंदिराच्या सेवादाराला, तिला प्रवेश का नाकारला, अशी विचारणा करते. तेव्हा, तिच्या चेहऱ्यावर ध्वज असल्याचे कारण सेवादार सांगतो. तो भारताचा ध्वज आहे, असे सांगितल्यावर ‘हे पंजाब आहे, भारत नाही’ असे उत्तर सेवादाराने दिल्याचे व्हिडीओत दिसले. 

यावर, भारताच्या राष्ट्रध्वजाशी साधर्म्य असलेल्या तीन रंगांचा वापर केल्याने संबंधित कर्मचाऱ्याने राष्ट्रध्वजाचा अपमान केला असे होत नाही. तिच्या चेहऱ्यावरील ध्वज  राष्ट्रध्वज नव्हता कारण त्यात अशोक चक्र नव्हते. तो राजकीय ध्वज असू शकतो असे स्पष्टीकरण  एसजीपीसी सरचिटणीस गुरचरण सिंग गरेवाल यांनी दिले. तसेच, हे शीख धार्मिक स्थळ आहे, प्रत्येक धार्मिक स्थळाचे काही रिवाज असतात, आम्ही सर्वांचे स्वागत करतो..शीख नेहमीच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर होते आणि स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलिदान दिले होते, असेही नमूद केले. व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Punjabपंजाब