सीबीआय मुख्यालयासमोरील आंदोलनात तृणमूल काँग्रेसही सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 09:43 AM2018-10-26T09:43:49+5:302018-10-26T10:11:15+5:30
सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादामुळे आता राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.
नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या हकालपट्टीविरोधात आज नवी दिल्लीतील मुख्यालयासह देशातील कार्यालयांसमोर काँग्रेस निदर्शने करणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार असून या आंदोलनात आता तृणमूल काँग्रेसनेही उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादामुळे आता राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न तसेच राफेल खरेदी घोटाळ्याची चौकशी थांबविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने काल केला होता. तसेच गुरुवारी सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेर इडीचे अधिकारी पाठवून हेरगिरी करत असल्याचा आरोपही केला होता.
#Delhi Trinamool Congress to join the Congress party protest led by Rahul Gandhi at Central Bureau of Investigation headquarters against the removal of CBI Director Alok Verma; Visuals from outside CBI headquarters in Delhi pic.twitter.com/Q6qVFQTW6H
— ANI (@ANI) October 26, 2018
या विरोधात काँग्रेसने आज, शुक्रवारी सकाळी सीबीआयच्या मुख्यालयासह देशातील कार्यालयांसमोर निदर्शने करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभुमीवर दिल्ली पोलिसांनी सीबीआय मुख्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या आंदोलनाला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून तृणमूलचे खासदार नदीम हक हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Delhi: TMC MP Nadeem Ul Haq will join the Congress protest led by Rahul Gandhi at Central Bureau of Investigation HQ against the removal of CBI Director Alok Verma.
— ANI (@ANI) October 26, 2018