शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

‘तृणमूल’ चे नेते शुभेन्दू अधिकारी यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 3:52 AM

ममता बॅनर्जींशी तीव्र मतभेद; भाजपकडून पक्षप्रवेशाचे आमंत्रण

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तीव्र मतभेद झालेले ज्येष्ठ मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शुभेन्दू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजपने म्हटले. 

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असून त्याच्या पार्श्वभूमीवर शुभेन्दू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा हा ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला बसलेला मोठा राजकीय धक्का आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठविला, तसेच राजीनाम्याच्या पत्राची एक प्रत राज्यपालांनाही दिली. 

शुभेन्दू अधिकारी हे वाहतूक व जलसंधारण खात्याचे मंत्री होते. मंत्रिपदावरून दूर झाले असले तरी त्यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, शुभेन्दू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तृणमूल काँग्रेस तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहण्याचे शुभेन्दू अधिकारी यांनी सोडून दिले होते. ममता यांच्याशी असलेले मतभेद अधिक तीव्र झाल्याने अधिकारी यांनी हे पाऊल उचलले. ममता बॅनर्जी यांचा भाचा व लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसमध्ये मिळणारे महत्त्व शुभेन्दू अधिकारी यांना मान्य नव्हते. 

नाराज आमदार भाजपमध्ये जाणार तृणमूल काँग्रेसचे आमदार मिहीर गोस्वामी हे भाजपचे खासदार निशित प्रामाणिक यांच्याबरोबर नवी दिल्लीत गेले असून, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.  गोस्वामी यांनी मागील काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षात २२ वर्षे राहिल्यानंतर अपमान सहन होत नसल्यामुळे पक्षात राहणे कठीण होत आहे, असेही ते फेसबुकवर पोस्टमध्ये म्हणाले होते. त्यांचे मन वळविण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न करण्यात येत होते. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा