शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये कोणाचं असणार सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 07:27 IST

ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांत कोणत्या पक्षाचं सरकार बनणार ?, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.

आगरताळा/कोहिमा/शिलाँग- ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांत कोणत्या पक्षाचं सरकार बनणार ?, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत तिन्ही राज्यांमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्रिपुरामध्ये सत्ताधारी सीपीएम आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं सर्व शक्ती पणाला लावली आहे. एक्झिट पोलनुसार, तिन्ही राज्यांत भाजपा घवघवीत यश मिळवून एक मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दोन एक्झिट पोलमध्ये कम्युनिस्टांकडे गेल्या 25 वर्षांपासून असलेली त्रिपुराची सत्ता भाजपा खेचून आणणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यातील निवडणूक निकालाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्रिपुरात 18 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. परंतु काही कारणास्तव तिन्ही राज्यांत 59 जागांवरच मतदान झालं आहे. त्रिपुराच्या 59 विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी करण्यासाठी 20 ठिकाणी 59 मतमोजणी केंद्रे बनवण्यात आली आहेत. मतमोजणीदरम्यान व्हिडीओग्राफीसुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी तपस रय यांनी दिली आहे. तर मेघालयचे निवडणूक आयुक्त एफ. आर. खारकोंगोर यांनी सांगितलं की, मतदान कक्षाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय पॅरामिलिस्ट्री फोर्सला तैनात करण्यात आलं आहे. त्रिपुरावर सर्वांच्याच नजराया तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये त्रिपुराच्या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. इथं गेल्या 25 वर्षांपासून कम्युनिस्टांचं सरकार आहे. केरळ सोडल्यात कम्युनिस्टांचं सरकार फक्त त्रिपुरात आहे. यावेळी भाजपानं त्रिपुरा ताब्यात घेण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. एक्झिट पोलमधूनही भाजपाचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात 92 टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केलं होतं. नागालँड ठरवणार पुढची दिशानागालँडमध्ये यावेळी निवडणुकीत अस्थिर वातावरण आहे. अनेक संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसला सर्व 60 जागांवर उमेदवारही उभे करता आलेले नाहीत. भाजपाचा सहयोगी पक्ष एनपीपी दुरावला असून, भाजपानं इतर पक्षांसोबत युती केली आहे. मेघालयमध्ये काँग्रेसचा किल्ला वाचणार ?मेघालयमध्ये काँग्रेस बालेकिल्ला राखणार का, याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मेघालयमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास राज्यात पक्ष संपल्याचं चित्र उभं राहील. त्यामुळे भाजपाच्या काँग्रेसमुक्त भारताच्या दाव्याला आणखी मजबुती मिळणार आहे. काँग्रेसला या निवडणुकीत चांगलं यश मिळवावं लागणार आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक