कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. ९८ पैकी पाच ग्रामपंचायतींने बिनविरोधचा झेंडा फडकविल्याने आता ९३ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष ४ आॅगस्टला मतदान होत आहे. पैकी नऊ गावांत तिरंगी तर ७७ गावांत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आणखी सात ग्रामपंचायती अंशत: बिनविरोधच्या उंबरठ्यावरती आहेत.शेवाळवाडी-उंडाळे, भुयाचीवाडी, भोळेवाडी, भरेवाडी, पाचुंद या ग्रामपंचायती ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बिनविरोध केल्या आहेत. उर्वरित ९३ ग्रामपंचायतींत बनवडी, खोडजाईवाडी, खालकरवाडी, म्हारुगडेवाडी, शिंदेवाडी, लटकेवाडी, भैरवानाथनगर-काले या ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.निवडणूक होत असलेल्या गावांपैकी पाल, हजारमाची, विंग, वहागाव, सैदापूर, गोवारे, बेलवडे हवेली, मालखेड, म्होप्रे येथे तिरंगी लढत होत आहे, तर ओंड, गोळेश्वर, वारुंजी, निगडी, खराडे, रिसवड, खोडजाईवाडी, खालकरवाडी, म्हारूगडेवाडी, साळशिरंबे, शिंदेवाडी-विंग, तासवडे, भैरवनाथनगर,लटकेवाडी, मालखेड, कालवडे, वाठार, बेलवडे बुद्रुक, वडगाव-उंब्रज, मरळी, पेरले, कोळे, पोतले, पार्ले, वडोली निळेश्वर, कार्वे, घोणशी, घारेवाडी, खोडशी, गोटे, म्होप्रे, घोगाव, टाळगाव, केसे, अभयचीवाडी, किरपे, काले, बेलदरे, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डी, विरवडे, करवडी, बनवडी, शिरवडे, येरवळे, चचेगाव, खुबी, कोडोली, सवादे, शेवाळेवाडी-म्हासोली, शिवडे, वराडे, भवानवाडी, अंबवडे, बामणवाडी, मुंढे, शहापूर, नवीन कवठे, उंडाळे, म्हासोली, चिखली, हजारमाची, वाघेरी, नांदलापूर, गोळेश्वर, सुर्ली, कामथी, हणबरवाडी, गायकवाडवाडी, धोंडेवाडी, नांदगाव, गमेवाडी, साजूर, गोटेवाडी, हरपळवाडी, इंदोली, चोरे, जिंती, अकाईचीवाडी, कोणेगाव, वाघेश्वर, शेणोली, येणके, पाडळी-केसे, वसंतगड, येथे दुरंगी लढत होत आहे.तालुक्यातील तारुख ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी दोघेजण रिंगणात उतरले आहेत.ज्या गावांमध्ये सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामध्ये सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील राजकारणाच्या बदलत्या समीकरणांचा गावोगावच्या निवडणुकींवर प्रभाव पडलेला दिसून येत आहे. अनेक गावांत पक्षीय झेंडे, गटतट यापेक्षा भावकी, बुडका याचे राजकारण सुरू झाले आहे.तालुक्यात ‘यंदा सरपंच आमचाच’ या इर्र्षेेला पेटून गावोगावचे नेते, कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत. त्यामुळे आता गुलाल कोण घेणार? याच्या पैजाही लावल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक होत असलेल्या ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)चौकाचौकांत झळकतायत फलक !ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारास आता प्रारंभ झाला आहे. गावागावांतील मुख्य चौकासह रस्त्याकडेला निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे व पॅनेल प्रमुखांचे फोटो व चिन्हाचे रंगीत फलक लावण्यात आले आहेत.कार्यकर्त्यांकडून ‘हायटेक’ प्रचारग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काहीजण नामीशक्कल लढवित आहेत. उमेदवारांचे जाहीरनामे, निवडणूक चिन्हाचे, घोषवाक्यांनी तयार केलेल्या घोषणा या व्हाट्सअॅप, फेसबुकवर टाकत हायटेक प्रचार केला जात आहे.
नऊ गावांत तिरंगी; ७७ ठिकाणी दुरंगी...
By admin | Published: July 27, 2015 10:16 PM