सोनामुरा/आगरतळा : माणिक सरकार मुख्यमंत्री असलेल्या त्रिपुरात निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी राज्याला आणखी ‘माणिक’ची गरज नसून हीरा (हायवेज, आय-वेज, रोडवेज आणि एअरवेज-एचआयआरए) हवा आहे, असे उद्गाल काढले. चलो पालतई (बदल घडवू या) अशी घोषणा देत त्यांनी राज्याला चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचे आश्वासन दिले. भाजपने व्यापार, पर्यटन आणि प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत केल्याचे ते म्हणाले.माणिक सरकार यांच्या सरकारने राज्यात विरोधात कोणी बोलू नये, असे भीतीचे वातावरण तयार केले आहे. त्रिपुरात सरकारी कर्मचा-यांना अद्यापही चौथा वेतन आयोगच लागू असून सरकारने कर्मचा-यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
त्रिपुराला ‘माणिक’ नव्हे, ‘हीरा’ हवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:38 IST