हैदराबाद : २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली.
त्यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती नाव बदलले आहे. टीआरएसचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा निर्णय पक्षाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या संदर्भात विशेष ठरावही मंजूर करण्यात आला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काही दिवसापूर्वी देशरातील विरोधी पक्षांची भेटी घेतल्या. पक्षाचे नाव बदलण्याआधीच एचडी कुमारस्वामी, टी थिरुमावलावन, नितीश कुमार, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांसोबत बैठकी झालेल्या आहेत, त्यामुळे आता नाव बदलल्यामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा सुरू आहे.
निवडणूक आयोगाने तेलंगणातील मुनुगोडे येथे पोटनिवडणूक जाहीर केली असतानाच केसीआर यांनी पक्षाचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. येथे ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. केसीआर आता राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची देशभरात प्रसिद्धी करणार आहेत. ‘तेलंगणा गुड गव्हर्नन्स मॉडेल’ सादर करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.