आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथे रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक ऑटो एका ट्रकला धडकते. या धडकेत ऑटोमध्ये बसलेली शाळकरी मुले हवेत उडल्याचे दिसत आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक आणि ऑटो यांच्यात झालेल्या धडकेचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
"आमची औषधं संशोधनावर आधारित, पतंजली खोटा प्रचार करत नाही"; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण
सकाळी सातच्या सुमारास ही मुले बेथनी शाळेत जात असताना हा अपघात झाला. ३५ सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संगम शरत थिएटर जंक्शनवर हलकी वाहतूक दिसत आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या खालून एक ट्रक वाहतूक सिग्नल ओलांडत आहे. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या ट्रकला ऑटोने धडक दिली. ट्रक आणि ऑटोची धडक इतकी जोरदार होती की ऑटोमध्ये बसलेल्या मुलं हवेत अनेक फूट दूर उडाली.
या अपघातानंतर अनेक दुचाकीस्वार आणि स्थानिक लोक जखमींच्या मदतीसाठी येताना दिसत आहेत. ऑटोमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनीही प्रयत्न केले. पोलिसांनीही या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेत आठ मुले जखमी झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यापैकी चार जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आठ शाळकरी मुलांपैकी चार मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच काही प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करण्यात येत आहे.