शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार, तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 2:45 PM

केंद्र सरकारने 'हिट अँड रन' कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे.

Truck Drivers Protest : केंद्र सरकारने 'हिट अँड रन' कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशभरातील ट्रक/टँपो/पेट्रोल-डिझेल टँकर चालकांनी संप पुकारला आहे. देशभरातील मालवाहू ट्रक चालक या आंदोलनात उतरले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. तसेच, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग लागत आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. 

ट्रक/टँकर वाहतुकीचे असे माध्यम आहे, ज्याद्वारे फळे आणि भाजीपाल्यापासून सर्व जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल-डिझेल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेले जाते.  ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या मुंबईत दररोज 1.20 लाख मालवाहू ट्रक आणि कंटेनर येतात. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील अनेक भागांत या संपाचा परिणाम दिसून येत आहे.

450 कोटींचे नुकसानपरिवहन मंडळाच्या म्हणण्यानुसार, एक दिवसाच्या संपामुळे 120 ते 150 कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत 3 दिवसांच्या संपामुळे 450 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संपामुळे देशभरात महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे. सामान्यांना पेट्रोल आणि डिझेलची चिंता सतावत आहे. 

महागाई वाढू शकतेपेट्रोल पंप असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 3-4 दिवसांच्या संपाचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येईल. दुचाकी वाहनधारक 3-4 दिवसांसाठी पेट्रोलचा साठा करू शकतात. मात्र मोठी वाहने आणि चारचाकी वाहनांची अडचण आहे. संप जास्त दिवस सुरू राहिला, तर साठा संपेल आणि पंपावर पेट्रोल-डिझेल उपलब्ध नसताना त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येईल. ट्रकचालकांच्या संपामुळे फळभाज्यासह सर्वच खाद्यपदार्थांचा पुरवठा ठप्प होऊन महागाईचा धोका वाढणार आहे.

संपाचे कारण काय ?केंद्र सरकारने चालकांसाठीच्या हिट अँड रन प्रकरणात नवीन कायदा केला आहे. नवीन नियमानुसार, जर कोणी वाहनाला धडक देऊन पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय मोठा दंडही भरावा लागणार आहे. या नियमाविरोधात ट्रकचालकांनी तीन दिवसांचा संप जाहीर केला आहे. आमची चूक नसली तरी शिक्षा भोगावी लागेल, असे चालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :agitationआंदोलनInflationमहागाईEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतPetrolपेट्रोलDieselडिझेल