शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप

By बाळकृष्ण परब | Published: December 02, 2020 7:24 PM

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहेएआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतातट्रकचालकांच्या या भूमिकेमुळे देशात जीवनावश्यक वस्तूंसह या इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ट्रकचालकांच्या या भूमिकेमुळे देशात जीवनावश्यक वस्तूंसह या इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी शेतकऱ्यांकडून मात्र आंदोलन सुरू आहे. चिल्ला बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमधील काल झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे.एआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.शेतकरी नेते स्वराज सिंह यांनी सांगितले की, आम्ही रस्त्यावर बसलेलो नाही. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून आणि जवानांना तैनात करून आमची वाट अडवली आहे. आम्ही या जागेला तात्पुरत्या तुरुंगाची उपमा दिली आहे. तसेच आम्हाला येथे अडवणे हे अटकेप्रमाणे असल्याचे आम्ही मानतो. आता आम्हाला ज्याक्षणी सोडले जाईल तेव्हा आम्ही दिल्लीच्या दिशेने कूच करू.

टॅग्स :Farmerशेतकरीroad transportरस्ते वाहतूकdelhiदिल्ली