शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

अदानींवर २०१४ नंतर ‘खरी जादू’; ६०९व्या क्रमांकावरून इतके श्रीमंत कसे झाले - राहुल गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 7:23 AM

तुमच्या भेटीनंतर अदानींना कंत्राट मिळाल्याचे किती वेळा घडले, गेल्या २० वर्षांत अदानींनी भाजपला किती पैसे दिले, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती पैसे दिले गेले?’ अशी प्रश्नांची सरबत्ती राहुल यांनी मोदींवर केली. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आणि अदानी समूहाशी संबंधित प्रकरणांचा हवाला देत आरोप केला की, मोदी २०१४ मध्ये दिल्लीत आल्यानंतर अशी काही खरी जादू घडली की आठ वर्षांत उद्योगपती गौतम अदानी जगातील ६०९ व्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणलेल्या आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना ‘अदानीजी तुमच्यासोबत किती वेळा परदेशात गेले होते? तुम्ही परदेशात गेल्यानंतर अदानीजींनी किती वेळा त्या देशाला भेट दिली, तुमच्या भेटीनंतर अदानींना कंत्राट मिळाल्याचे किती वेळा घडले, गेल्या २० वर्षांत अदानींनी भाजपला किती पैसे दिले, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती पैसे दिले गेले?’ अशी प्रश्नांची सरबत्ती राहुल यांनी मोदींवर केली. 

‘अग्निपथ’ लष्करावर लादली- तपास यंत्रणेचा गैरवापर करून मुंबई विमानतळ अदानींकडे सोपवण्यात आले. अदानी पंतप्रधान आणि देशाच्या सरकारच्या मदतीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून हजारो कोटी रुपये मिळवतात. - हिंडनबर्गच्या अहवालात म्हटले आहे की, अदानींच्या परदेशात सेल कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून भारतात कोणाचा पैसा येतोय? या सेल कंपन्या कोणाच्या आहेत आणि पैसा कोणाचा येत आहे हे शोधण्याची जबाबदारी देशाच्या सरकारची आहे. - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व गृहमंत्रालयाने आणलेली ‘अग्निपथ’ योजना लष्करावर लादली.

राहुल गांधी जामिनावर का? : भाजपराहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांवर पलटवार करताना भाजपने म्हटले की, राहुल गांधी व सोनिया गांधी जामिनावर का आहेत, एवढे सांगावे. रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरण काय आहे, हे जनतेला सांगितले पाहिजे. यूपीए सरकारच्या कालावधीत दररोज घोटाळा उघडकीस येत होता. राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. संसदेत तथ्य समोर ठेवावे लागतात. ते कुठे आहेत? 

मोदींच्या उत्तराकडे लक्षपंतप्रधान मोदी बुधवारी संसदेत राहुल गांधी यांच्या आरोपांना कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर मोदी राहुल गांधींसह सर्व विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतील. सूत्रांनी सांगितले की, यूपीए काळातील घोटाळ्यांचा उल्लेख होऊ शकतो.

...हे तर अदानींचे परराष्ट्र धोरणराहुल गांधी म्हणाले, ‘पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला गेल्यावर करार करतात, ज्यावर स्टेट बँकेकडून अदानी समूहाला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले जाते. हे भारताचे परराष्ट्र धोरण नसून, ते अदानीजींचे परराष्ट्र धोरण आहे,’ असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानीcongressकाँग्रेसBJPभाजपा