शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

सत्य दडवले जाऊ शकत नाही, गुजरात विकास मॉडेलचा पोकळपणा उघड - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने गाजावाजा केलेल्या गुजरात विकास मॉडेलची कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. गुजरात मॉडेल अयशस्वी ठरल्याने भाजपमध्ये घबराट पसरली आहे, असे ते म्हणाले.

अहमदाबाद, दि. 4 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने गाजावाजा केलेल्या गुजरात विकास मॉडेलची कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. गुजरात मॉडेल अयशस्वी ठरल्याने भाजपमध्ये घबराट पसरली आहे, असे ते म्हणाले.

गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. मोदींच्या राज्यात होणाऱ्या या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची जय्यत तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. त्याच उद्देशातून राहुल यांनी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दीर्घकाळ सत्य दडवले जाऊ शकत नाही. गुजरात विकास मॉडेलचा पोकळपणा उघड झाला आहे. त्यामुळे मोदी आणि भाजप गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत चिंतित बनले आहेत. यावेळी गुजरातमध्ये सरकार स्थापण्यापासून कॉंग्रेसला कुणीच रोखू शकत नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस दोन दशकांपासून अधिक काळ गुजरातच्या सत्तेपासून दूर आहे.

युवक, शेतकरी, छोटे व्यावसायिक किंवा दुकानदार अशा कुठल्याच घटकाला गुजरात मॉडेलचा उपयोग झाला नाही. त्याचा लाभ केवळ 5 ते 10 व्यक्तींना झाला असा दावा करत राहुल यांनी कुणाचा नामोल्लेख टाळला. मोदी सरकार प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत आहे, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्या, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आगामी निवडणुकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित करता येऊ शकतील, अशी सूचनाही त्यांनी केली.

पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत माफी देण्यात येणार नसल्याचा इशारा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. केवळ भारतीय जनता पक्ष आणि त्याची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ठामपणे काम करणाऱ्या व्यक्तींनाच गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल; असेही राहुल यांनी सुनावले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी