नवी दिल्ली : आयडीबीआयकडून कर्ज म्हणून घेतलेल्या ८00 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात विजय मल्ल्या यांना परदेशातून भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर सल्ला घेत आहे. त्यांचा पासपोर्ट निलंबित केल्यानंतर त्यांना भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने परराष्ट्र मंत्रालयाला केली आहे. मल्ल्या यांच्याविरुद्ध हवाला व्यवहाराचाही आरोप आहे.मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीने ९४00 कोटी रुपयांची बँकांची थकबाकी दिलेली नाही.
मल्ल्याना परत आणण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 2:46 AM