भारतात TikTok (टिकटॉक) बंद झाल्यानंतर अमेरिकेनेही चीनच्या अॅपवर बंदी आणली आहे. या दरम्यान अमेरिकेची मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करणार होती. याबाबत चर्चाही सुरु होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर बंदी आदेश जारी करताच टिकटॉकने आता रिलायन्सवर दोरे टाकायला सुरुवात केली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. रिलायन्स टिकटॉक खरेदी करू शकते अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. याच्याशी संबंधित सहा लोकांनी ईटीला याची माहिती दिली आहे. टिकटॉकचे सीईओ केविन मेयर रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले आहेत. (tiktok approches ril to sell its business) त्यांना रिलायन्स भारतातील टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करू इच्छित आहे की नाही हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. एका अधिकाऱ्यांने सांगितले की, रिलायन्स आणि टिकटॉकचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत.
आता रिलायन्स टिकटॉक खरेदी करणार असल्याच्या चर्चांनी बाजार गरम असला तरीही कंपनीने मात्र ही अफवा असल्याचे सांगितले आहे. यावर त्यांनी अन्य कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिलायन्स प्रवक्त्याने सांगितले की कंपनी नेहमी सेबीच्या नियमांचे पालन करते. स्टॉक एक्स्चेंजच्या कारारानुसार आम्ही सूचना देतो.
दुसरीकडे टिकटॉकनेही ईटीला कोणतेही उत्तर दिलेले नाही. मायक्रोसॉफ्टनेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. केविन मेयर यांनाच मेल करण्यात आला होता. मात्र, सुत्रांनुसार टिकटॉक डीलची चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात आहे. कदाचित ही डील होणारही नाही, कारण यामध्ये खूप अडचणी आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या....
लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले
राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने
तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही
Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2
पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला
Gold Rate : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव
OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन
CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा
पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज
खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी