नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे. परंतु एका आरटीआय कार्यकर्त्यानं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगसंदर्भात माहिती मागवली. तर तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत गोखले यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. माहिती अधिकारातून मिळालेलं ते उत्तर गोखले यांनी सार्वजनिक केलं आहे.साकेत गोखले पोस्टमध्ये लिहितात, तुकडे तुकडे गँग अधिकृतरीत्या अस्तित्वात नाही. ती फक्त अमित शाह यांची एक कल्पना आहे. तुकडे तुकडे गँग हा शब्दप्रयोग बऱ्याचदा उजव्या विचारसरणीचे लोक डाव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करण्यासाठी करतात. दिल्ली जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU)च्या एका कार्यक्रमात कथित स्वरूपात राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यानंतर तुकडे तुकडे गँग हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जाऊ लागला.
तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 2:34 PM
गेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे.
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे.तर तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे.