अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून खळबळ उडाली आहे. तुनिशा तिच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या शूटिंगसाठी नायगाव येथील सेटवर पोहोचली. तुनिशाचा को-स्टार शीझानच्या म्हणण्यानुसार, तो दुपारी 3 वाजता त्याच्या मेकअप रूमजवळ पोहचला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर आता अभिनेता शीझान खानच्या आईने यावर भाष्य केलं आहे.
शीझानची आई आणि बहिणीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांवर खुलासा केला आहे. शीझान खानच्या आईने सांगितले की, "तुनिशा माझ्या मुलीसारखी होती. आम्ही कधीही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. तुनिशा मला अम्मा म्हणायची... शीझानवरचे आरोप चुकीचे आहेत." दुसरीकडे, शीझानच्या बहिणीने तुनिशासोबत बहिणीसारखेच संबंध असल्याचं म्हटलं आहे. त्याला दर्ग्यात नेण्याची बाब चुकीची आहे. आम्ही तुनिशाला खूप आनंद दिला होता असंही सांगितलं.
तुनिशासोबत आमचे संबंध खूप चांगले होते, असे शीझान खानच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. आम्ही जो धर्म मानतो तो आमचा पर्सनल असतो. आम्ही कोणावर दबाव आणत नाही, दर्गा आणि हिजाबची चर्चा चुकीची आहे. व्हायरल होत असलेला हिजाबचा फोटो शोमधील आहे असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शीझानच्या वकिलांनी यानंतर आता गंभीर आरोप केला आहे की, तुनिशाचे तिच्या कुटुंबियांशी चांगले संबंध नव्हते. एवढेच नाही तर अभिनेत्रीच्या आईने तिचा गळा दाबला होता. शीझान खानच्या वकिलाने पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, तिच्या आईने तुनिशाचा गळा दाबला होता.
"तुनिशाच्या आईनेच दाबलेला तिचा गळा, द्यायची नाही पैसे"
तुनिशाने ही गोष्ट मालिकेच्या दिग्दर्शकालाही सांगितली होती ज्यामध्ये ती त्यावेळी काम करत होती. याशिवाय तिने आपल्या आईचा मित्र असलेल्या संजीव कौशलचाही उल्लेख केला. वकिलाचे म्हणणे आहे की, तुनिशा संजीवला घाबरत होती. संजीवमुळे एंग्जाइटी इश्यू होता आणि याच कारणामुळे ती तिचा मित्र कंवर ढिल्लोसोबत तीन महिने राहिली. शीझानच्या वकिलाचा असाही दावा आहे की, तिची आई तुनिशाच्या कष्टाची कमाई स्वत:कडे ठेवायची आणि तिने तिला त्यातला एक पैसाही दिला नाही. पैशांसाठी तुनिशाला वारंवार आईसमोर हात पसरायची. तसेच आई वनिता शर्मा तुनिशाला पैसे मागितल्यावर खूप प्रश्न विचारत असे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"