शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

टुरिझम हवाय की टेररिझम ?

By admin | Published: April 03, 2017 6:56 AM

टुरिझम हवाय की टेररिझम, याचा निर्णय काश्मिरी तरुणांनी घ्यायचा आहे

सुरेश भटेवरा,उधमपूर- टुरिझम हवाय की टेररिझम, याचा निर्णय काश्मिरी तरुणांनी घ्यायचा आहे. पहिला मार्ग आर्थिक सुबत्ता वाढवणारा आहे, तर दुसरा मार्ग जम्मू काश्मीरचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा. तरुणांनी साथ दिली, तर काश्मीरचे भाग्य बदलल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.चेनानी-नाशिर या सर्वात लांब बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर, विराट जाहीर सभेत पंतप्रधानांनी अनेक नाजूक विषयांना स्पर्श करीत उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग उपस्थित होते.काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या दगडफेकीचा उल्लेख करीत, मोदी म्हणाले की, दगडाची किंमत मला माहीत आहे. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बोगदा निर्माण करण्यासाठी जम्मू काश्मिरातले ९0 टक्के तरुण तीन वर्षे दिवस-रात्र दगड फोडीत होते. हा बोगदा जम्मू आणि श्रीनगरमधील भौगोलिक अंतरच नाही, तर दोन भागांतल्या जनतेच्या मनातले अंतरही दूर करणारा आहे. दुसरीकडे हातात दगड घेऊ न काश्मीरचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचे काम काही तरुण करीत आहेत. त्यांच्या दहशतीमुळेच येथील पर्यटन व्यवसाय त्यांच्या दहशतीमुळेच थंडावला आहे. मुख्यमंत्री महेबुबा यांनी श्रीनगर खोऱ्यात पर्यटन किती सुरक्षित व आल्हाददायक आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वारंवार या भागाचा दौरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांचेही या प्रसंगी भाषण झाले. मोदींची आजची ही सभा विराट म्हणता येईल, इतकी मोठी होती.राज्यात आणखी ९ बोगदे - गडकरी२0१८ पर्यंत जम्मू-श्रीनगर हे २८९ किलोमीटरचे अंतर २३१ पर्यंत कमी करण्याचे काम सुरू आहे. येथे रस्ते सर्वोत्तम बनवण्यासाठी ६0 हजार कोटींचा खर्च दोन वर्षांत करू. राज्यात आणखी ९ बोगदे तयार होतील.. त्यात लेहजवळ ६ हजार कोटी खर्चाच्या जोजी ला पास बोगद्याचाही समावेश आहे. बोगद्याची संख्या १३ पर्यंत नेण्याचा इरादा आहे जम्मूमध्ये ३१00 कोटी आणि श्रीनगरमधे २२00 कोटी रिंग रोडसाठी खर्च होणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटन आणि रोजगार वाढेल व राज्याचा विकासही वेगाने होईल. >केंद्र सरकार तुमच्या पाठिशी पर्यटकांना एकदा तरी काश्मीरला जावे, असे वाटते. त्यांची भीती दूर करण्याची जबाबदारी इथल्या तरुणांवर आहे. गेली ४0 वर्षे दहशतवादाने राज्याला ग्रासले. त्यातून पदरात काही पडले नाही. भूतकाळात जे घडले, ते बदलण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यासाठी केंद्र सरकार तुमच्या पाठिशी आहे. राज्याच्या विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ८0 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज देऊ केले. त्यातली निम्मी अधिक रक्कम कामांवर खर्च झाली आहे, असे ते म्हणाले. मोबाइलचे फ्लॅश चमकवून... भाषणाच्या सुरुवातीलाच मोबाइलचे फ्लॅश चमकवून जनतेनेच बोगद्याचे उद्घाटन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या वेळी हजारो तरुण ‘मोदी मोदी’ घोषणांचा गजर करीत मोबाइलचे फ्लॅश चमकवीत होते. आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या एक पाऊ ल पुढे जात, अत्याधुनिक सुविधांनी युक्त बोगद्याचे शिल्प घडवल्याबद्दल नितीन गडकरी व त्यांच्या साऱ्या टीमची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.