Turkey Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशांतील शेकडो इमारती कोसळल्या. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 560 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 100 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूकंपात उध्वस्त झालेल्या तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी भारताने पाऊल टाकले आहे. सोमवारी पंतप्रधान कार्यालयाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तुर्कीला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुर्की सरकारच्या समन्वयाने एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके मदत सामग्रीसह पाठवण्याची तयारी सुरू आहे.
प्रशिक्षित श्वानपथकासह 100 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन NDRF पथके आणि विशेष बचाव पथकातील आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत. वैद्यकीय पथके प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसह आवश्यक औषधांसह रवाना होणार आहेत.
बंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुर्कस्तानमधील विनाशकारी भूकंप आपण सर्वजण पाहत आहोत. तुर्कस्तानजवळील देशांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतातील 140 कोटी जनतेच्या सहानुभूती सर्व भूकंपग्रस्त लोकांसोबत आहेत. तसेच भारत भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असंही पीएम मोदी म्हणाले.
सीरिया आणि तुर्कीमध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मदत दिली आहे. दोन्ही देशांमध्ये 640 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो जखमी झाले आहेत. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याशी रशियाचे जवळचे संबंध आहेत. पुतीन यांचे तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांच्याशीही घट्ट संबंध आहेत. भूकंपग्रस्त भागात वैद्यकीय पथके, शोध आणि बचाव पथके आणि त्यांची वाहने पाठवण्यासाठी तुर्की हवाई दलाने आपली विमाने तयार केली आहेत.