नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील त्यांच्यासोबत असणार आहे. ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होणार आहे. ट्रम्प दाम्पत्य अहमदाबाद आणि दिल्लीला जाणार आहेत. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा उल्लेख केला आहे.मोदी आणि ट्रम्प यांचा कार्यक्रम अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर ठेवण्यात आला आहे. भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी शनिवारी सकाळी एक ट्विट केले. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीफेसबुकवर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प ट्विटमध्ये म्हणतात की, झुकरबर्गने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की ट्रम्प फेसबुकवर पहिल्या क्रमांकावर आहेत. ही बाब अभिमानास्पद आहे. त्याचवेळी त्याने दुसऱ्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान मोदी असल्याचे म्हटले होते. पुढील दोन आठवड्यात मी भारताच्या दौऱ्यावर जात आहे. भारतात जाण्यासाठी मी उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते.
याआधी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदींना महान पुरुष संबोधले होते. तसेच भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उच्छूक असल्याचा सूचक इशारा दिला आहे.