नवी दिल्ली : देशात २0१४ साली १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अनेक सदस्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व्यक्त केली.अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद केली नाही. त्यामुळे हा आकडा खूप कमी आहे, अशी तक्रार काही सदस्यांनी केली. मात्र कृषिमंत्र्यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध राज्य सरकारांतर्फे आर्थिक मदत केली जाते. बहुसंख्य शेतकरी कर्जाच्या भारामुळेच आत्महत्या करीत असल्याने त्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यावर अनेक राज्यांना मदतीच्या विविध योजना सुरू आहेत आणि पंतप्रधान शेती विमा योजनाही सर्वत्र लागू करण्यात आली आहे, असे सांगत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे हाच शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा मार्ग आहे, असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशामध्ये बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: August 06, 2016 3:53 AM