शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

जुळ्या भावांनी सुरू केला ऑनलाईन बिझनेस; वर्षाला 1 कोटींचा टर्नओवर, 70 कारागिरांना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:39 PM

भारतीय कारागिरांनी अमेरिकेसारख्या मोठ्या देशात त्यांची निर्यात सुरू केली आहे.

20 वर्षांच्या दोन जुळ्या भावांनी भारतीय ऑनलाईन व्यवसायात मोठे नाव कमावले आहे. त्यांची कंपनी इंडियन कारीगर Amazon सारख्या मोठ्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर चांगलं काम करत आहे. मुझफ्फरपूरचे अनुनय नंदा आणि अनुभव नंदा हे दोघे जुळे भाऊ आहेत. या दोघांनी दोन वर्षांपूर्वी इंडियन कारीगर नावाची कंपनी स्थापन केली आणि उत्सवाशी संबंधित उत्पादनांची ऑनलाईन विक्री सुरू केली. आज त्यांच्या इंडियन कारीगर कंपनीची वार्षिक विक्री 1 कोटी 20 लाख आहे. त्याचा व्यवसाय अमेरिकेत पसरला आहे.

अनुनय आणि अनुभव सांगतात की, दोन्ही भावांनी एकत्र व्यवसाय सुरू करण्याची कल्पना केली होती. ते सांगतात की भारत हा सणांचा देश आहे. वर्षभर एक ना एक उत्सव होतो. मात्र सणाशी संबंधित वस्तू सर्वत्र लोकांना उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत त्यांनी महोत्सवात वापरण्यात येणारी उत्पादने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी भारतीय कारागिरांच्या माध्यमातून ऑनलाईन दिवे विकण्याचे काम सुरू केले. भारतीय कारागिरांकडून दिवे बनवून त्यात विविध रंग भरून, भारतीय कारागीर Amazon वर उपलब्ध करून दिले. सुरुवातीच्या महिन्यातच याला चांगली मागणी मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. 

70 कारागिरांना दिला रोजगार 

पहिल्याच दिवशी 14 ऑर्डर प्राप्त झाल्या. कंपनी सुरू केल्यापासून महिनाभरात 1 लाखांपर्यंत विक्री झाली. त्यामुळे त्यांना काम पुढे नेण्याची हिंमत मिळाली. अनुभव नंदा सांगतात की, आज देशातील सुमारे 70 कारागीर आमच्याशी जोडले गेले आहेत, जे सण-उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्य़ा वेगवेगळ्या वस्तू बनवतात. अनुभव सांगतात की, भारतीय कारागिरांना चांगले आणि मोठे व्यासपीठ देणे हा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना चांगली कमाई करता येईल. यामुळेच आपले भारतीय कारागीर दीप तसेच हर्बल गुलाल, ख्रिसमससाठी वाईन कॅप आणि इतर अनेक उत्पादने तयार करत आहेत.

अमेरिकेतही वाढत आहे व्यवसाय 

अनुनय आणि अनुभव हे सांगतात की त्यांच्या उत्पादनांची मागणी परदेशातही वाढत आहे. भारतीय कारागिरांनी अमेरिकेसारख्या मोठ्या देशात त्यांची निर्यात सुरू केली आहे. ते म्हणतात की वाढता व्यवसाय पाहता त्यांच्या कंपनीने परदेशातही स्वतःचे वेअरहाऊस बांधले आहे. अशा परिस्थितीत स्टार्टअपच्या युगात या दोन जुळ्या भावांच्या कंपनीने अवघ्या दोन वर्षांत कमाल केली आहे, असे म्हणता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी