नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त ट्विटरनं विशेष इमोजी लाँच केलं आहे. उद्या महात्मा गांधींची 150 वी जयंती आहे. त्या निमित्तानं आजपासून ट्विटरवर महात्मा गांधींचं इमोजी वापरता येईल. हे इमोजी निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं असणार आहे. याआधीही अनेकदा ट्विटरनं विविध सण आणि दिनांच्या निमित्तानं इमोजी लाँच केले होते. उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे. त्यासाठी ट्विटरनं विशेष इमोजी लाँच केलं आहे. #GandhiJayanti, #MahatmaGandhi, #MKGandhi, #BapuAt150, #MyGandhigiri, #NexusOfGood, #MahatmaAt150, #गाँधीजयंती, #ગાંધીજયંતિ हे हॅशटॅग वापरल्यानंतर ट्विटर वापरकर्त्यांना विशेष इमोजी दिसतील. आजपासून हे हॅशटॅग वापरल्यावर वापरकर्त्यांना गांधीजींचा इमोजी दिसेल. हा इमोजी पुढील आठवडाभर वापरता येईल, अशी माहिती ट्विटर इंडियानं दिली.याआधी ट्विटरनं दिवाळी, गणेश चतुर्थी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं इमोजी लाँच केले होते. उद्या देशभरात महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. ब्रिटिशांनी लादलेल्या अन्यायकारक कराविरोधात त्यांनी 1930 मध्ये दांडी यात्रा काढली होती. तर 1942 पासून त्यांनी भारत छोडो अभियान सुरू केलं. स्वातंत्र्य चळवळीत गांधींचं योगदान अनन्यसाधारण असल्यानं त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जातं. महात्मा गांधींनी कायम अहिंसेचा पुरस्कार केला. त्यामुळेच 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.
गांधीजींच्या जयंती निमित्त ट्विटरकडून स्पेशल इमोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 3:34 PM