ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - सोशल नेटवर्किंमध्ये अग्रेसर असणा-या ट्विटरने भारताचा अविभाज्य घटक असलेला जम्मू-काश्मीर हा भाग चीन आणि पाकिस्तानमध्ये असल्याचे दर्शविले आहे.
ट्विट करताना जर ठिकाण (लोकेशन) निवडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जम्मू आणि काश्मीर निवडले तर तो भाग 'Jammu and Kashmir, People‘s Republic of China' आणि 'jammu Pakistan' असे दर्शविण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या आणि भारताचा भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान सातत्याने कुरघोड्या करत असतो. इंटरनेटद्वारेही हा भाग भारतात आहे की अन्यत्र याबाबत वाद निर्माण केले जातात. आता ट्विटरनेही या प्रकारात उडी घेतली आहे. ट्विटरच्या या कृतीबद्दल भारतीय नेटिझन्स तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.