मुंबई - भारतात आधीपासून नुकसानात असलेली माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरनं देशातील ३ पैकी २ ऑफिस बंद केली आहेत. कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या कॉस्ट कटिंगचा हा हिस्सा आहे. याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. मस्क यांनी टेकओव्हर केल्यानंतर ट्विटरनं मागील वर्षी भारतातील २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.
रिपोर्टनुसार, Twitter इंडियाने दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांना टाळे ठोकले आहे. मात्र कंपनीच्या बंगळुरू कार्यालयात काम सुरू राहील, जेथे बहुतेक इंजिनिअर काम करतात. २०२३ च्या अखेरीस ट्विटरला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्याची एलन मस्कची योजना आहे. यामुळे मस्कने जगभरातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. टेकओव्हर केल्यानंतर, अब्जाधीश बॉस किमान खर्चासह कंपनी चालवण्याची योजना आखत आहेत.
भारतात ट्विटर तोट्यातट्विटरसाठी सुरुवातीपासूनच भारतीय बाजारपेठ तोट्यात आहे. कंपनीचे जितके सब्सक्राइबर्स आहेत तितक्या प्रमाणात कंपनीला उत्पन्न मिळत नाही. त्याच वेळी, इतर अमेरिकन सोशल मीडिया साइट्स मेटा आणि गुगलसाठी भारताची बाजारपेठ सर्वात फायदेशीर डील आहे. या कंपन्यांकडे भारतातील सर्वोत्तम ग्राहकवर्ग आहे, जिथे इंटरनेटचा वापर वाढत आहे. एवढेच नाही तर भारतातही ऑनलाइन व्यवसाय वाढत आहे, जो मेटा आणि गुगलसाठी फायद्याचा ठरत आहे.
ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे सर्वाधिक फॉलोअर्स दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत ट्विटर हे एक सार्वजनिक व्यासपीठ बनलं आहे. असे असूनही मस्कची कंपनी नफा कमावत नाही. एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ८६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचप्रमाणे, अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे मिलियन फॉलोअर्स आहेत. ट्विटरच्या सक्रिय यूजर्सची संख्याही चांगली आहे, परंतु व्यवसायाच्या बाबतीत कंपनी खूपच मागे आहे.
ऑफिसचे भाडे द्यायलाही पैसे नाहीतएलन मस्कने ट्विटर $44 बिलियनला विकत घेतले आहे, परंतु कंपनी इतक्या तोट्यात आहे की सॅन फ्रान्सिस्को कार्यालय आणि लंडन कार्यालयाचे भाडेही भरण्यासाठी कंपनीकडे पुरेसा निधी शिल्लक नाही.