नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे अशा अफवा पसरविणारे 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असून आतापर्यत 4 ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.
जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईद शांततेत साजरी झाल्याचे दिसून आले. परंतु काही सामाजकंटकांनी ट्विटरद्वारे जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आल्याने त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती, मात्र जम्मू- काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी काश्मीर खोऱ्यात बकरी ईद अगदी शांततापूर्ण वातावरणात साजरी झाली असून अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अशी अफवा पसरविणाऱ्या 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच या अकाऊंट पैकी 4 अकाऊंट आतापर्यत बंद करण्यात आले आहे.
यामध्ये या 8 ट्विटर अकाऊंटचा समावेश आहे.
@kashmir787
@Red4Kashmir
@arsched
@mscully94
@sageelaniii(बंद)
@sadaf2k19(बंद)
@RiazKha61370907(बंद)
@RiazKha723(बंद)