ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 21 - चेन्नईमध्ये दोन नावाजलेल्या व्यक्तींची घरं एकमेकांपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मात्र या दोघांमध्ये शत्रू देशांसारखं नातं आहे. ते दोघे दुसरे, तिसरे कोणी नसून कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी आहेत. एक राज्यसभेचे खासदार आहेत, तर दुसरे दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. या दोघांमध्ये सोशल मीडियावर सध्या ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, कमल हासनच्या राजकारण प्रवेशाला मी विरोध करणार आहे. यावरून दोघांमध्येही ट्विटरवर चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. स्वामींना एका फॉलोव्हर्सनं ट्विटरवरून विचारले की, तामिळनाडूच्या जनतेनं कमल हासनला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी निवडल्यास भाजपा त्यांचं स्वागत करणार का ?, त्यावर स्वामी म्हणाले, भाजपाचं माहीत नाही, पण कमजोर आणि मूर्ख कमल हासलना मी विरोध करेन, त्यानंतर कमल हासननंही ट्विट करून स्वामींना प्रत्युत्तर दिलं.
कमल हासन ट्विटमध्ये म्हणाला, आमच्याकडे वादासाठी एक कारण आहे. मला आनंद आहे की, त्यांचा विरोध करावा लागणार नाही, माझ्याऐवजी उलट जनताच त्यांना विरोध करेल, मी कठोर होऊन स्वामींना उत्तर देणार नाही. कारण स्वामींना राजकारण करण्याचा जास्त अनुभव आहे. स्वामींना हाड नसलेलं जेवण आवडत असले तरी मात्र मला ते आवडत नाही. दोन ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या उत्तराला जवळपास 2 हजार लोकांनी रिट्विट केलं आहे.@satishrajaram5 : I don't know about BJP but I will oppose this boneless wonder and pompous idiot called Kamal Hasan
— Subramanian Swamy (@Swamy39) February 20, 2017
I have1 bone of contention..Its good https://t.co/hkjuatVLrZ called Tamils porikis.Glad I wont have 2 oppose him People will.— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 20, 2017
Wont retort with rudeness.His experience exceeds mine in acidic political exchanges. He might like his meal boneless.I don't.Bon apitit sir— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 20, 2017