नवी दिल्ली: टूलकिट वादामुळे चर्चेत आलेल्या ट्विटरनं आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हँडलवरील ब्लू टिक हटवली आहे. महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या अकाऊंटला ट्विटरकडून ब्लू टिक दिली जाते. याचा अर्थ ते अकाऊंट व्हेरिफाईड आहे असा होतो. मात्र ट्विटरनं व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटवरील ब्लू टिक काढली आहे. ही माहिती समजताच अनेकांनी ट्विटरवरच आपला रोष व्यक्त केला.ट्विटरनं उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक कशी काढली? हा भारतीय घटनेवरील हल्ला आहे, अशी संतप्त भावना भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुवा यांनी व्यक्त केली. मात्र काही ट्विटर वापरकर्त्यांच्या मते, नायडूंचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ते अनव्हेरिफाईड करण्यात आलं असावं.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट Unverified; ब्लू टिक हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 10:19 AM