ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आज 125वी जयंती असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्यांच्या अनुयायांसाठी ट्विटरने खास हॅशटॅग उपलब्ध करुन दिले आहेत. ट्विटवर #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल. ट्विटरने याव्यतिरिक्त अजून चार हॅशटॅग दिले आहेत.
ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरने एकूण पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.
या पाच हॅशटॅगवर इमोजी
#AmbedkarJayanti
#अंबेडकरजयंती
#DalitLivesMatter
#JaiBhim
#जयभीम
ट्विटरवर काहीही बोलायचं असल्याचं हॅशटॅगचा वापर केला जातो. त्यामुळे नेमका कोणता ट्रेंड सुरु हेदेखील लक्षात येतं. तसंच हॅशटॅगमुळे सर्च करताना त्यासंबंधी सर्व गोष्टी सर्च करणंही सोपं जातं. या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. गेल्या वर्षी गुगलनं खास डूडल तयार करुन बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. ट्विटरने या हॅशटॅग इमोजीच्या माध्यमातून एकाप्रकारे बाबासाहेबांना अभिवादनच केलं आहे.
Celebrate the legacy of B.R.Ambedkar with #ambedkarjayanti emoji! Join the conversation using our special hashtags, all through the weekend! pic.twitter.com/BXy0AdMcNN— Twitter India (@TwitterIndia) April 13, 2017