ट्रक-दुचाकी चालकाच्या वादात महामार्ग अडीच तास ब्लॉक
By admin | Published: November 05, 2016 10:48 PM
नशिराबाद: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने त्यातून दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद झाला. ट्रकची चावी नाल्यात फेकल्याने रस्त्यावर ट्रक थांबून असल्याने तब्बल अडीच तास महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे वाहतूक तरसोदमार्गे नशिराबाद अशी वळविण्यात आली होती. ही घटना शनिवारी दुपारी नशिराबाद-हातेड नाल्यावर घडली.
नशिराबाद: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने त्यातून दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद झाला. ट्रकची चावी नाल्यात फेकल्याने रस्त्यावर ट्रक थांबून असल्याने तब्बल अडीच तास महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे वाहतूक तरसोदमार्गे नशिराबाद अशी वळविण्यात आली होती. ही घटना शनिवारी दुपारी नशिराबाद-हातेड नाल्यावर घडली.जळगावहून भुसावळला जाणार्या दाम्पत्याला ओव्हरटेक करणार्या ट्रकने कट मारला. या घटनेत भीतीपोटी दुचाकीवरील महिलेने उडी मारली, सुदैवाने तिला कुठलीही इजा झाली नाही, मात्र या प्रकारामुळे दुचाकी चालक व ट्रक चालक यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी प्रचंड गर्दी जमा झाली होती. या वादात कोणीतरी ट्रकची चावी काढून नाल्यात फेकली, त्यामुळे ट्रक जागेवरुन हलविणे शक्य नव्हता, परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, वासुदेव मराठे, गोकुळ तायडे, चंद्रकांत पाटील, नीळकंठ महाजन व युनूस शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. चावी सापडत नसल्याने कारागीर बोलावून दुसर्या चावीने ट्रक सुरू करण्यात आला. या काळात दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्गावर अपघात झाल्याचीही अफवा पसरली होती.फोटो...९६