नवी दिल्ली - गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या औरंगजेब याचे दोन भाऊ मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही लष्करात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. गतवर्षी 14 जून रोजी ईदच्या सणासाठी घरी परतत असलेल्या औरंगजेबची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. 'आपला प्रदेश, देश वाचवण्यासाठी आणि भावाच्या हत्येचा बजला घेण्यासाठी आम्ही लष्करात दाखल झालो आहोत,' असे मोहम्मद शब्बीर याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
अभिमानास्पद! शहीद जवान औरंगजेबचे दोन भाऊ भारतीय लष्करात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:19 PM