लैंगिंक छळाला कंटाळून बालसुधारगृहातून दोन मुले पळाली
By admin | Published: July 02, 2015 11:47 PM
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सापडली मुले : मुलांनी फोडले सुधारगृहात होत असलेल्या छळाचे बिंग
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सापडली मुले : मुलांनी फोडले सुधारगृहात होत असलेल्या छळाचे बिंगपुणे : लहान वयात गुन्हा केलेल्या मुलांना सुधारून चांगल्या मार्गी लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली बालसुधारगृहेच जर या मुलांना वाम मार्गाला लावत असतील तर... कल्पनाच करवत नाही ना... पण शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात असा प्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लैंगिक छळाला कंटाळून या सुधारगृहातील २ मुलांनी काल मध्यरात्री पळ काढला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हि मुले सापडली. त्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार उघड झाला.हे प्रकरण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजताच दुपारी त्यांनी बालसुधारगृहात येऊन आंदोलन केले. त्यानंतर बालसुधारगृह आणि पोलीस प्रशासन हालले. अवघ्या ८ ते १० वर्षाच्या वय असलेल्या या दोन मुलांनी सांगितले की, बालसुधारगृहात असलेल्या मोठया मुलांकडून लहान मुलांकडून अश्लिल चाळे करून घेतले जातात. जी मुले याला विरोध करतात त्यांना हि मोठी मुले काठीने, हाताने मारतात. त्यामुळे घाबरून काही मुले बालसुधारगृहातील अधिकारी, शिकविणार्या सरांना याची माहिती देतात. तशी आम्हीही दिली. मात्र कोणीही काहीच केले नाही. याउलट आम्हीच खोटे बोलत असल्याचे सांगत आम्हाला ओरडण्यात आले. त्यामुळे मोठी मुले आम्हाला खूपच त्रास देत होती. त्यामुळे आम्ही बालसुधारगृहातून पळण्याचा निर्णय घेतला आणि काल मध्यरात्री भरलेली बॅग घेऊन मागच्या भिंतीवरून पळून गेलो. रस्त्यावरून जात असताना काही दादांनी आमच्याकडे विचारणा केली आणि ते पुन्हा आम्हाला बालसुधारगृहात घेऊन आले.राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी बालसुधारगृहाचे अधिक्षकांकडे याची विचारणा केली. ते म्हणाले, शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात सुमारे १६० मुले आहेत. या मुलांची पार्श्वभूमी हि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने त्यांना सुधारण्यासाठी बालसुधारगृहात काम होणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसून येत नाही. येथील मुलांचा लैंगिक छळ होत असल्याचे या मुलांनी सांगितल्याने धक्काच बसला. त्यामुळे आम्ही आंदोलन केले.