शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अंधश्रद्धेतून मुलाकडून दोघांची हत्या

By admin | Published: October 27, 2015 11:32 PM

पश्चिम दिल्लीत दोन दिवसांत दोघांची थरारक पद्धतीने हत्या करीत एका १६ वर्षीय मुलाने जगात कीर्तिवंत आणि ऐश्वर्यसंपन्न होण्याचा निवडलेला मार्ग अद्यापही समाजमनावर अंधश्रद्धेचा

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीत दोन दिवसांत दोघांची थरारक पद्धतीने हत्या करीत एका १६ वर्षीय मुलाने जगात कीर्तिवंत आणि ऐश्वर्यसंपन्न होण्याचा निवडलेला मार्ग अद्यापही समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे हेच दर्शविणारा आहे. शाळा सोडलेल्या या किशोरवयीन मुलाला रविवारी पोलिसांनी अटक केली.तो निहाल विहार या कमी उत्पन्न गट असलेल्या वस्तीत राहतो. त्याने शक्रवारी दुसरा खून केला होता. या मुलाने मोफत दारूचे आमीष दाखविल्यामुळे २६ वर्षीय प्रदीपने त्याला या कामी मदत केली. किमान दहा जणांचा खून केल्यास जगभरात प्रसिद्धी आणि सर्व प्रकारची संपत्ती पायाशी लोळेल असा दृष्टांत त्याला पवित्र बाबाने स्वप्नात दिला होता. या मुलाची आई रोजमजुरी करते तर मोठा भाऊ भंगारविक्रीचे काम करतो. त्याने २५ वर्षीय कन्हय्या याची भोसकून हत्या करीत दहा जणांच्या हत्यासत्राचा मार्ग अनुसरला होता, असे संकेत त्याने दोन दिवसांत दोघांना संपविल्यावरून मिळतात. २१ आॅक्टोबर रोजी या मुलासह प्रदीपने कन्हय्याला हातभट्टीची दारू देण्यासाठी निर्जनस्थळी नेत भोसकले होते. ४८ तासांतच त्याने हरिराम (४०) याला शरीरभर भोसकून मारले. हरिरामलाही त्याने दारूचे आमीष दाखविले होते. कायद्याची नव्याने चर्चागंभीर गुन्ह्णांमध्ये लहान मुलांचा वाढता सहभाग पाहता बलात्कार आणि हत्याकांडात सहभागी अशा मुलांवर प्रौढांप्रमाणे कारवाई करण्यासाठी वयोमर्यादा कमी करीत १६ वर आणण्याची मागणी होत असताना राजधानीतील या हत्याकांडाने नव्याने चर्चेला तोंड फोडले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)