बंगळुरू: आनंद सिंग (विजयनगर) आणि रमेश जरकीहोळी (गोकाक) या काँग्रेसच्या दोन आमदारांनी सोमवारी लागोपाठ आमदारकीचे राजीनामे दिल्याने मतभेदांमुळे आधीच डळमळीत झालेल्या कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेस आघाडी सरकारचे बहुमत अवघ्या तीनवर आले.सिंग व जरकीहोळी यांनी आपापले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले, मात्र त्यांनी राजीनाम्याची कारणे उघड केली नाहीत. दोघेही भाजपमध्ये जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाराज असलेले काँग्रेसचे आणखी सहा आमदार पक्ष आणि पद सोडण्याच्या विचारात असल्याचेही बोलले जाते. त्यांच्यापैकी एक भीमा नाईक यांनी मात्र आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २२५ पैकी १०५ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांना सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने ३७ जागा जिंकणाºया जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊन आघाडी सरकार स्थापन केले होते. बसपचा व एक अपक्ष आमदार सोबत घेऊन ११९ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते. आधी उमेश जाधव यांनी दिलेला राजीनामा गृहित धरला तर सोमवारच्या दोन राजीनाम्यांनी सरकारचे बहुमत अता अवघ्या तीनवर आले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी काळभैरवेश्वर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ््यासाठी सध्या अमेरिकेत सॅन जोस येथे आहे. या राजीनाम्यांनंतर त्यांनी तेथून टिष्ट्वट करून म्हटले की, भाजप आमचे सरकार पाडण्याचे दिवास्वप्न रंगवित आहे, पण त्यात त्यांना यश येणारनाही. (वृत्तसंस्था)सरकार पाडणार नाहीदुसरीकडे भाजपचे नेते बी. एस. येदियुरप्पा म्हणाले की, काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या मीही वाचल्या. आम्ही हे सरकार पाडणार नाही. मात्र सरकार स्वत:हून पडले तर आम्ही पर्यायी सरकार स्थापनेच्या शक्यतेवर विचार करू.गेल्या लोकसभा निवडणुकीत जद(एस)-काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यापासून सरकारमधील कुरबुरी वाढल्या आहेत. राज्यातील लोकसभेच्या २८ पैकी २५ जागा भाजपाने व एक जागा भाजपने पाठिंबा दिलेल्या एका अपक्षाने जिकली होती. राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतील पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी फक्त एक जागा आली होती.
कर्नाटकात काँग्रेसच्या २ आमदारांचे राजीनामे; भाजप म्हणते, सरकार पडल्यावर विचार करू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 1:08 AM