शाहजहानपूर : उत्तर प्रदेशमधील भाजप नेते चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित विद्यार्थिनीच्या समर्थनार्थ तिच्या पदयात्रा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ८० काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली.पदयात्रा रोखण्यासाठी पोलिसांनी शाहजहानपूर जिल्ह्याची सर्व बाजूंनी नाकेबंदी केली होती, असा आरोप काँग्रेसने केला. पदयात्रेत सहभागी झालेले माजी केंद्रीय मंत्री जितीनप्रसाद, धीरज गुर्जर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कौशल मिश्रा, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते अजयकुमार लल्लू यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, शाहजहानपूर येथे निर्बंध लागू असतानाही काँग्रेस कार्यालयासमोर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभा घेण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अटक करण्यात आली. या सभेसाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली नव्हती. जितीनप्रसाद यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप कौशल मिश्रा यांनी केला. (वृत्तसंस्था)प्रियंका गांधी आंदोलनाचे नेतृत्व करणारनवी दिल्ली : स्वामी चिन्मयानंद यांना राज्य सरकार वाचवत असल्याचा आरोप करून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आक्रमक झाल्या आहेत.उत्तर प्रदेशातील भाजप सरकार लोकशाहीची लक्तरे करीत आहे. बलात्कारातील आरोपीला वाचवण्यासाठी शाहजहानपूरच्या मुलीचा आवाज दाबला जात आहे. हे सरकार कोणत्याही पातळीवर घसरू शकते. - प्रियंका गांधी यांचे टिष्ट्वटकाँग्रेसचे लोक वाकणार नाहीत. ते दडपशाहीला तोंड देतील. उत्तर प्रदेश सरकार मुलींवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठिशी उभे आहे आणि विरोध करणाºयांना अटक करीत आहे. संघर्षाच्या या मार्गावर ठामपणे उभे राहू. - राहुल गांधी यांचे टिष्ट्वट80 पेक्षा जास्त काँग्रेस नेत्यांना झालेल्या अटकेने संतप्त प्रियंका गांधी आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या ८० कार्यकर्त्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:38 AM