जयपूर : जयपूरचे रेहमानी मॉडेल स्कूल हे केवळ नावालाच आदर्श नाही. दोन दशकांपासूनचा मदरसारूपांतरित होऊन ही शाळा बनली. अल्पसंख्याक समुदायाचे १३०० विद्यार्थी तेथे शिकतात. रा.स्व. संघाच्या आदर्श विद्यामंदिरात शिकविणारे कैलाशचंद्र यादव हे त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.मुस्लीमबहुल रामगंजच्या गल्ल्यांमध्ये उभी राहिलेली ही शाळा जातीय सलोख्याचे उदाहरण बनली आहे. सर्वच मुले मुस्लीम असून निम्मे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. शाळेच्या संचालक मंडळातही मुस्लीम सदस्य असले तरी एकूण ६३ शिक्षकांपैकी मुख्याध्यापकासह ९ शिक्षक हिंदू आहेत. १९९५ मध्ये या शाळेला पहिला मुस्लिमेतर शिक्षक मिळाला. (वृत्तसंस्था)मदरसा सुरू करणारे रेहमानी कल्याण सोसायटीचे अध्यक्ष ७२ वर्षीय अब्दुल कय्यूम अख्तर यांना उच्च माध्यमिकपर्यंत शाळेचा विस्तार बघायचा आहे. मुस्लिमेतर शिक्षकांच्या समावेशाबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, शिक्षकांचा धर्म कोणता ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची नाही. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची आहे. आम्ही शाळेत ईद साजरी करतो; मात्र होळी आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरत नाही.
दोन दशकांपासूनच्या मदरशाची बनली शाळा
By admin | Published: April 12, 2016 2:27 AM