नवी दिल्ली, दि. 27- तुमच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात रसमलाई खायला गेल्यावर काउंटरवर उभं राहून मिठाई खाण्यात आणि दुकानात टेबलवर बसून मिठाई खाण्यात काय फरक आहे ? असा प्रश्न विचारल्यावर जास्त फरक नाही हेच उत्तर मिळतं. दुकानात बसून आरामात रसमलाई खाऊ शकतो. असं उत्तर दिलं जाइल. पण दुकानात बसून मिठाई खाण्याच्या कम्फर्ट व्यतिरीक्त दोन वेगवेगळे जीएसटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही दुकानाच्या काउंटरवर थांबून मिठाई खाल्ली आणि बील भरून लगेच दुकानाच्या बाहेर पडलात तर विक्रेत्याकडून बीलावर 5 टक्के जीएसटी आकारला जाइल पण जर तुम्ही दुकानात एसीमध्ये बसून मिठाई किंवा इतर पदार्थ खाल्ला तर तुम्हाला 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. हाच नियम आवडीच्या असलेल्या ढोकळा या पदार्थावरही लागू होइल. जर दुकानाच्या काउंटरवरून ढोकळा घेऊन गेलात तर 12 टक्के जीएसटी द्यावा लागेल पण जर तिथेच बसून ढोकळा खाल्ला तर 18 टक्के जीएसटी लागू होइल. प्रत्येक दुकानादार यासाठी आपली वेगळी पद्धत सुरू करत आहेत. दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात ग्राहकांना बसून खाण्याची सुविधा नाहीये पण तिथे काही टेबल लावण्यात आले आहेत. तिथे थांबून लोक मिठाई खाण्याचा आनंद घेतात. त्या दुकानात ग्राहकांकडून 5 टक्के जीएसटी घेतला जातो. 'जर तुमच्या दुकानात बसण्यासाठी मोठी जागा असेल तर जास्त टॅक्स घेऊ शकता. पण आमच्या दुकानात इतकी मोठी जागा नाही, असं त्या दुकानाच्या मालकाने सांगितलं आहे. विशेष म्हणजे दुकानात असलेल्या वेगवेगळ्या करपद्धतीबद्दल बऱ्याच ग्राहकांना माहिती नाही. म्हणूनच हातात बील आल्यावर टॅक्स पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. टॅक्स एक्सपर्टच्या मते, जीएसटीच्या बाबतीतील सद्यस्थितीबद्दल ग्राहकांना माहिती असणं गरजेचं आहे. एकाच पदार्थासाठी टॅक्समधील फरक ग्राहकांना माहिती असायला हवी. जो पदार्थ दुकानाच्या काउंटवर थांबून खाल्ल्यावर कमी टॅक्स लागतो तोच पदार्थ जर दुकानात टेबलावर बसून आरामात ऑर्डर केला तर जास्त टॅक्स द्यावा लागेल. मिठाई व्यतिरिक्त इतर फास्ट फूडच्या दुकानांमध्येही अशा प्रकारचा टॅक्स लागला जाऊ शकतो. जर हॉटेलमध्ये बसून चहा प्यायलात तर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल पण तोच चहा जर बाहेर थांबून प्यायला तर 12 टक्के जीएसटी लागू होतो. वातानुकुल हॉटेलमध्ये बीलावर 18 टक्के जीएसटी निश्चित आहे तर इतर हॉटेलच्या बीलावर 12 टक्के जीएसटी निश्चित आहे.
GST Impact- एकाच पदार्थावर दोन वेगवेगळे जीएसटीचे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 12:00 PM
तुमच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात रसमलाई खायला गेल्यावर काउंटरवर उभं राहून मिठाई खाण्यात आणि दुकानात टेबलवर बसून मिठाई खाण्यात काय फरक आहे ? असा प्रश्न विचारल्यावर जास्त फरक नाही हेच उत्तर मिळतं
ठळक मुद्देGST Impact- एकाच पदार्थावर दोन वेगवेगळे जीएसटीचे दरतुमच्या आवडीच्या मिठाईच्या दुकानात रसमलाई खायला गेल्यावर काउंटरवर उभं राहून मिठाई खाण्यात आणि दुकानात टेबलवर बसून मिठाई खाण्यात काय फरक आहे ? असा प्रश्न विचारल्यावर जास्त फरक नाही हेच उत्तर मिळतंदुकानात बसून मिठाई खाण्याच्या कम्फर्ट व्यतिरीक्त दोन वेगवेगळे जीएसटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.