Karnataka Bus Stop: काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील म्हैसूर येथील बसस्थानकाचे फोटोज इंटरनेटवर व्हायरल झाले होते. बस स्टॉपवर तीन घुमट बांधण्यात आले होते. हे घुमट एखाद्या 'मशिदीसारखे' दिसत होते. या बांधकामाचा अनेकांनी विरोध केला होता. भाजप खासदाराने तर हे बसस्थानक पाडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता बसस्थानकाला नवीन रूप देण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय महामार्ग-766 च्या केरळ बॉर्डर-कोलेगला सेक्शनवर असलेल्या बस स्टॉपवर आता फक्त एकच घुमट ठेवण्यात आला आहे. या घुमटाला लाल रंगही देण्यात आला आहे. तीनपैकी दोन घुमट काढण्यात आले आहेत. भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी हे बसस्थानक पाडण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हे घुमट काढण्यात आले.
जेसीबीने पाडण्याचा इशारा दिला होताखासदार प्रताप सिम्हा यांनी जेसीबीने बसस्थानक पाडण्याचा इशारा दिला होता. तसेच, म्हैसूरच्या बहुतांश भागात अशा 'घुमटय़ासारख्या' वास्तू बांधल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजप खासदाराचे हे वक्तव्य फुटीर असल्याची टीका विरोधकांसह अनेकांनी केली. विशेष म्हणजे, स्थानिक भाजप आमदार राम दास यांनीच हे बस स्टॉप बांधले आहे.
आमदारानेच दोन घुमट काढलेभाजप आमदाराने सुरुवातीला आपल्या सहकारी खासदाराच्या इशाऱ्याला कानाडोळा केला होता. पण, नंतर स्थानिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी माफी मागितली आणि दोन घुमट काढणार असल्याचे सांगितले. यानंतर रविवारी (27 नोव्हेंबर) सकाळी भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी बस स्टॉपमध्ये केलेल्या बदलांची बातमी शेअर केली आणि भाजप आमदारासह जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.