फरार असलेले दोन सराइत गुन्हेगार गजाआड सिंधी कॉलनीतील घरफोडी प्रकरण : दोघांना चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: March 30, 2016 10:20 PM
जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवरनगरात २५ जानेवारी रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी पाचोरा येथील दोन सराइत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोघेही घटना घडल्यानंतर फरार झालेले होते. दोघांना बुधवारी न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवरनगरात २५ जानेवारी रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी पाचोरा येथील दोन सराइत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोघेही घटना घडल्यानंतर फरार झालेले होते. दोघांना बुधवारी न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.शाहरूख तस्लीम बागवान (वय २२, रा.बाहेरपुरा, पाचोरा) व अमदजखान अन्वरखान (वय २३, रा.बाहेरपुरा, पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांना २९ मार्चला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी त्यांना न्यायाधीश एस.जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे ॲड.अनिल पाटील यांनी तर आरोपींतर्फे ॲड.डी.पी. लोहार यांनी कामकाज पाहिले.गुन्ात चार आरोपींचा सहभागकंवरनगरातील रहिवासी सुरेश गोपालदास नाथाणी यांच्या राहत्या घरात २५ जानेवारी २०१६ रोजी घरफोडी झाली होती. ही घरफोडी शेख मुख्तार शेख मेहबूब, शेख सलीम शेख बशीर, शाहरूख बागवान व अमजदखान अन्वरखान या चौघांनी केली होती. त्यांनी नाथाणी यांच्या घरातून चार लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. पोलिसांनी यापूर्वी शेख मुख्तारला १६ मार्चला तर शेख सलीमला १९ मार्चला अटक केली असून दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. चौघेही आरोपी सराइत गुन्हेगार असून त्यांनी शेंदुर्णी, जळगाव, मारवड, चाळीसगाव अशा विविध ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या आहेत. शेख मुख्तार व शेख सलीमकडून काही मुद्देमाल हस्तगत झाला आहे.