टिटवाळा : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या शासकिय कर्मचारी वर्गास एकाच कामासाठी दोन दोन आदेश आले आहे. एका आदेशाची अंमलबजावणी केली. पण दुसऱ्याची आदेशाची अंमलबजावणी न केल्याने कारणे दाखवा नोटीसा आल्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्याना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.निवडणूका आल्या की शिक्षक वर्गासह सर्वच शासकिय यंत्रणेला आपले काम सोडून निवडणूकीच्या कामाला जुंपले जाते. त्यात त्यांनी आपले काम ही करायचे नि निवडणूकीचे काम देखील करायचे. त्यात निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाचा फटका देखील या कर्मचारी वर्गाला सोसावा लागत आहे. असा प्रकार सध्या कल्याण विधानसभा मतदारसंघामध्ये घडला आहे. एकाच कर्मचाऱ्याला दोन ते तीन आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील काही शिक्षक कर्मचारी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या अशा या नियोजन शून्य कारभाराचा त्रास मात्र आम्हाला सहन करावा लागत आहे. एका आदेशाची अंमल बजावणी केली. परंतु दुसऱ्याची नाही केली म्हणून कारणे दाखवा अशा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. ज्या वेळी आम्ही आमच्या पहिल्या आदेशाची अंमलबजावणी केली, निवडणुकीच्या कामकाजाला लागलो. त्याच दिवशी आम्ही निवडणूक आयोगाला विनंती अर्ज केला की, आम्हाला दोन दोन आदेश आले आहेत. तरी देखील दुसऱ्या आदेशाचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा आल्याचे शेकडो शिक्षक व इतर शासकिय कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे.
एकाच कर्मचा-याला दोन कार्यादेश
By admin | Published: September 26, 2014 12:35 AM