नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या दोन आघाडीच्या लढाऊ विमानांचा शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान अपघात झाला. यात विंग कमांडरचा मृत्यू झाला. तर, दोन पायलट सुखरूप बाहेर पडले. संरक्षणतज्ज्ञांनी सांगितले की, रशियन-डिझाइन केलेले सुखोई-३० एमकेआय जेट आणि फ्रेंच मिराज-२००० ची हवेत टक्कर झाली असण्याची शक्यता आहे. परंतु हवाई दलाने याबद्दल कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अपघाताची माहिती दिली. हनुमंत राव सारथी यांच्या निधनाबद्दल राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले.
पाच वर्षांत अपघातांत ४२ जवानांचा मृत्यूगेल्या वर्षी मार्चमध्ये संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी राज्यसभेत सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत तिन्ही सेवांच्या विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातांत ४२ जवानांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानात सैन्याचे विमान कोसळलेnभरतपूर : राजस्थानच्या भरतपूरमध्ये सैन्याचे एक विमान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्थानकाजवळ चक नगला बीजा गावाजवळ ही दुर्घटना घडली. मोकळ्या जागेत हे विमान कोसळल्याचे भरतपूरचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले.nस्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि लोकांना येथून हटविले. स्थानिकांनी सांगितले की, अगोदर विमानाला आग लागली व नंतर कोसळले.
दोन पायलट सुखरूपमिराज विमानाच्या मृत वैमानिकाचे नाव विंग कमांडर हनुमंत राव सारथी असे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सुखरूप बाहेर पडलेल्या दोन पायलटना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.