उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यामध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. येथे एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या येऊन त्यांची धकड झाली. या अपघातात एका मालगाडीचं इंजिन रुळावरून घसरून नुकसानग्रस्त झालं आहे.
या अपघातात मालगाडीचे चालक आणि सहचालक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. सध्या रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, ते या अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत. हा अपघात फतेहपूर जिल्ह्यातील खागा पोलीस चौकीच्या हद्दीतील पांभीपूर येथे झाला.