पाटणा : सुमारे २०० नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनला घेराव घालून २२ आयईडींचा स्फोट घडवून आणला त्यात दहा जवान ठार पाच जण गंभीर जखमी झाले. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात जंगलात हा हल्ला सोमवारी दुपारी करण्यात आला. २००८ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने कोब्रा बटालियनची उभारणी केली असून प्रथमच तिची एवढी मोठी जीवितहानी झाली आहे. नक्षलवाद्यांविरोधात जंगलांत गनिमी पद्धतीने लढण्यासाठी खास ही बटालियन तयार करण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुमरी नाला भागात माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या चकरबंदा जंगलात नक्षलवाद्यांशी सोमवारी दुपारी चकमक सुरू झाली. कोब्रा तुकडीच्या मदतीला इतर दलांचीही मदत होती. या जंगलात काही वरिष्ठ पातळीवरील नक्षलवाद्यांचे नेते असल्याच्या संशयावरून त्यांच्या शोधासाठी विशेष कारवाई करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)>पंतप्रधानांकडून सांत्वनपंतप्रधानांनी सीआरपीएफच्या जवानांच्या मृत्युबद्दल मंगळवारी तीव्र दु:ख व्यक्त केले व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केली. जखमी जवान लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली.या जीवितहानीबद्दल नितीश कुमार यांनी तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना तत्काळ पाच-पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले.
दोनशे नक्षल्यांनी घेरून केला जवानांवर हल्ला
By admin | Published: July 20, 2016 5:27 AM